‘कर्ज फिटलं साहेब, पोरीच्या लग्नाला या’; अजितदादांचा आपुलकीचा प्रश्न… कुठं दिलं लेकीला?

मुंबई | आज ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 68 गावांतील 15 हजार 358 लाभार्थ्यांची आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर केली गेली आहे.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केल्यानंतर नगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

साहेब कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा झाली. आता मुलीच्या लग्नाची कायबी चिंता नाय… अजितदादा आणि उद्धवसाहेब लग्नाला या, असं आग्रहाचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी दिलं. त्यानर अजितदादांनी कुठं दिलं लेकीला? अशी आपुलकीने विचारपूस केली.

आताच्या सरकारच्या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? तुमचं किती कर्ज होतं?, कुठल्या पीकाला कर्ज घेतले होते?. आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला? असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्ध्यांना विचारले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

-70 वर्ष काय केलं? हा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रम्प यांनी भाषणातून उत्तर दिलंय- अशोक चव्हाण

-….म्हणून ट्रम्प यांची मी निंदा करतो; त्यांनी त्वरीत माफी मागावी- जितेंद्र आव्हाड

-डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात ‘या’ शब्दांचा उच्चार करताना चुकले; सोशल मीडियावर चर्चा

-ठाकरे सरकारने जाहीर केली कर्जमाफीची पहिली यादी; यादीत 15 हजार लाभार्थ्यांची नावे