केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

मुंबई |  कोरोनाचं राज्यावर आलेलं मोठं संकट आणि जवळपास दीड महिन्याचा लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्र सरकारच्या महसूलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यावर मोठं आर्थिक संकट घोंघावत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा, अशी महत्त्वाची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही महत्त्वाची मागणी केली आहे.

महाराष्ट्राची केंद्राकडे 16 हजार कोटींची थकबाकी आहे. ती थकबाकी जर केंद्राने महाराष्ट्राला आताच्या परिस्थितीत दिली तर राज्याला या आर्थिक संकटात जरासा दिलासा मिळेल, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.

दरम्यान, राज्याला 35 हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

-अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

-राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

-“शासनाने काही नियम अटी लागू करुन मंदिरं खुली करावीत”

-कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार; फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर