मुंबई-पुण्यामधून गावी जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती, म्हणाले…

मुंबई |   सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबई-पुण्यामधून जे नागरिक गावाकडे निघाले आहेत, अशा नागरिकांना त्यांनी कळकळीची विनंती केली.

आपण जसं परप्रांतीयांना पाठवलं तसं आता आपले लोकंही विचारायला लागले आहेत की आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच काही जिल्ह्यांना कोरोना आणखी शिवला देखील नाही. त्यामुळे आपण रेड झोनमधून ग्रीनझोनमध्ये जात आहोत आणि त्यांचाही जीव धोक्यात घालत आहोत. त्यामुळे जर खरंच गरज असेल तरच तुम्ही गावाकडे जा, अशी विनंती देखील त्यांनी केली.

गावी जाण्याची तुम्हाला खरोखरच गरज आहे का? याचा तुम्ही विचार करा. तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल कारण आपल्याला ग्रीन झोन हा ग्रीन झोनच ठेवायचा आहे तर ऑरेंज झोनला ग्रीन झोनमध्ये रूपांतरित करायचं आहे, असं ते म्हणाले.

मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता काही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!

-मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

-दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च

-हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

-माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण