‘हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नका’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

मुंबई | हा संकाटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

राजकारण जर सुरु केलं तर ते तुम्ही पण तुम्ही केलं म्हणून आम्ही राजकारण करणार नाही. कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही. तुम्ही काही बोला. मी प्रामणिकपणे काम करतोय. माझे सहकारी, माझे मंत्रीमंडळ प्रामाणिकपणे काम करत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. काही ठिकाणी आम्हाला उणिवा भासत आहेत. जसे पैसे, जीएसटीचा मुद्दा, अजूनही पैसे यायचे आहेत. इतर काही पैसे राज्य सरकारकडे अडकले आहेत. सुरुवातीला जसे पीपीई किट येत नव्हते. औषधांचा तुटवडा. रेल्वेचे पैसे अजून आले नाहीत. अशा गोष्टी मी जर का बोलायला लागलो तर ही माणुसकी नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, काहीजण असं विचारतात की, तुम्ही पॅकेज का नाही दिलं? अहो सगळं काही देतो. सर्वात अगोदर जे संकंट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकंट आहे. आरोग्यविषयक जोपर्यंत आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत उपयोग नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘जो मोदी जी की आरती गावे….’; ‘या’ भाजप मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लाँच

-“केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?”

-जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत- उद्धव ठाकरे

-‘आमच्या वॉर्डात का काम करतोस?’; ‘या’ भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण

-“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”