चिकन, मटन, मासे बिनधास्त खा आणि तंदुरस्त रहा; मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट

मुंबई |  चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, अशी अफवा गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरत आहे. या अफवेने पोल्ट्री व्यावसायिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांत चिकनचे दर प्रचंड घसरलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून बिनधास्त चिकन मटन मांसे खा आणि तंदुरूस्त रहा. चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत नाही, असं म्हटलेलं आहे.

पोल्ट्री व्यावसायिकांना गेले काही दिवस अतिशय कठीण परिस्थितीतून जावं लागलं आहे.  फेसबुक आणि व्हॉट्अ‌ॅपवरून चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, ही अफवा अत्यंत जोरात पसरली आहे. त्यामुळे ग्राहकांनी चिकन खाणं गेले काही दिवसांपासून बंद केले आहेत. त्यामुळे साहजिकच चिकनचे भाव उतरले आहेत. काही पोल्ट्री व्यावसायिकांनी तर कोंबड्यांची पिल्ले मारून टाकली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या तर्फे राज्याच्या जनतेला आवाहन केलं आहे की “कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कुक्कुट पक्ष्यांचे मांस अंडी किंवा मासे खाल्ले होत नाही. याउलट याचं सेवन नाही केल तर प्रथिनाची कमतरता जाणवू शकते, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आज हा आकडा 38 वर जाऊन पोहचला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आणि पुण्यात शासन जमावबंदीचे आदेश देण्याच्या विचाराधीन आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत

-मागची 5 वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील

-“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

-“शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा”

-कोरोबाबत पुण्यात अफवा पसरवण्यावर गुन्हा दाखल