मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला संबोधित केलं. यावेळी संबोधनाच्या सुरूवातीलाच त्यांनी उद्या साजऱ्या होणाऱ्या रजमान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांना महत्त्वाचं आवाहन केलं.
सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचं सांगताना मुस्लिम बांधवांनी देखील घरात राहूनच नमाज अदा करण्याचे व संपूर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना केले.
संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिले आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दुसरीकडे मंत्री नवाब मलिक यांनी देखील रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. या ईदला आपण घरात राहूनच नमाज अदा करूया तसंच उत्साहाने ईद साजरी करूया, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं
-चिंताजनक! राज्यात चोवीस तासात 87 पोलिसांना कोरोनाची लागण
-31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…