महाराष्ट्र मुंबई

“केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?”

मुंबई | राज्य सरकारकडून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिर पॅकेजची घोषणा व्हावी, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. मात्र या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

पॅकेज घोषित करण्यापेक्षा सध्याच्या घडीला आरोग्य सुविधा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं

विरोधक पॅकेज का नाही दिलं? असा प्रश्न विचारतात. केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली. पण हाती काय आलं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आरोग्य सुविधा निर्माण करणे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं आहे. सर्व वर्गासाठी मदत केली पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी 481 ट्रेन सोडल्या. त्याने सहा ते सात लाख मजूर गावी गेले. यामध्ये 85 कोटी रुपये खर्च झाले. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत झाली. पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत- उद्धव ठाकरे

-‘आमच्या वॉर्डात का काम करतोस?’; ‘या’ भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण

-“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”

-खासगी रूग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कळकळीची विनंती

-“हे जर असंच सुरू राहिलं तर कामगार कपातीप्रमाणे मंत्रीकपात करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”