Top news महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही मागणी पंतप्रधान मोदींनी केली मान्य

मुंबई | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली. 30 नोव्हेंबरपर्यंत देशातील गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. याचा लाभ देशातल्या 80 कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, “गेल्या तीन महिन्यात गरीबांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. 5 किलो गहू किंवा तांदूळ, 1 किलो डाळ आणि 1 किलो चणे असं धान्य मोफत दिलं. अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या-

-देशातील गरिबांना या तारखेपर्यंत मोफत धान्य देणार, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

-सॅमसंगचा नवा स्मार्टफोन ; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

-…तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?- संजय राऊत

-‘भाजपमध्ये गेलो असलो तरी…’; ‘या’ भाजप नेत्याने पवारांची बाजू घेत पडळकरांना झापलं

-‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेची अमित शहांवर टीका, म्हणाले…

IMPIMP