सातारा | राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते.
उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करुन त्याला बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. महाबळेश्वर येथे केवळ भारतातून नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येत असतात. यासाठी महाबळेश्वर येथे एक संशोधन केंद्र उभे करण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे अनेक लोक येथे पर्यटनासाठी येत असतात आणि त्यामुळे वाहनांची समस्याही निर्माण होते. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरच्या परिसरात वाहनतळ उभारुन बॅटरी किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता येईल का हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री तीन दिवसाच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कृषी विभागाला भेट दिली.
महत्वाच्या बातम्या-
-आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांनी दिलं सडेतोड उत्तर
-सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारचं कौतुक
-“तब्येत बिघडल्याने 2 पानं वाचायची राहिली… नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धुळफेक झाली असती”
-ते तिचं शरीर आहे… त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते; ट्रोलर्सना प्रियांकाच्या आईचं प्रत्युत्तर
-……म्हणून सुपर ओव्हरच्या ‘सुपर’ विजयानंतरही भारतीय संघाला मोठा दणका!