आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ मेसेज

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राला संबोधित करतात त्यावेळी कोरोनाला आपण हरवणारच असा मनोदय बोलून दाखवतातच. तोच मनोदय त्यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आता लोकांसमोर मांडला आहे.

कोरोनाविरोधात लढणाऱ्या कोरोनायोद्ध्यांसाठी म्हणजेच डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले सर्व कर्मचारी, पोलीस, स्वच्छता विभागातले कामगार यांचं मनोधैर्य वाढवणारा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर आणला आहे. आपण लढणार आपण जिंकणार असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.

काहीच दिवसांपूर्वी महारष्ट्राला संबोधित करताना कोणत्याही संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याच पद्धतीने सरकार कोरोनाविरोधातली लढाने नेटाने लढण्यासाठी योग्य ती पावलं टाकत आहेत. या कामात सरकारला प्रशासनाची मोलाची साथ मिळत आहे. त्याचीच पोचपावती गेल्या आठवडाभरात कोरोनातून सावरून रूग्णांची घरी जाण्याची संख्या वाढते आहे.

दरम्यान, कोरोनाला आपण नक्की हरवणार फक्त थोडे दिवस आपल्याला संयम ठेवावा लागेल. कोरोनावरचं सगळ्यात मोठं औषध हे संयम हेच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळआत घरात बसा. नियम तोडू नका, असं आवाहन ते सातत्याने करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारने देशाचा विश्वासघात केलाय; अखिलेश यादवांची टीका

-असदुद्दीन ओवैसींच्या मुखी पहिल्यांदाच मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले…

-फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवले ‘एवढे’ हजार कोटी

-राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल

-कोरोनासंबंधी मोदींनी घेतलेले निर्णय जगात सर्वोत्तम…