मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीतलगतच्या गावांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक संसार उघड्यावर आलेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत.
मुंबईतील भाऊचा धक्का इथून उद्धव ठाकरे अलिबागच्या दिशेनं रवाना झाले. रोरो बोटीतून त्यांनी अलिबागच्या दिशेचा प्रवास सुरु केला. यावेळी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.
वादळानंतर लगेचच रायगड जिल्ह्याला भेट देण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा आणि त्यातील काही कार्यक्रम निर्धारित आहेत. ज्यामध्ये ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.
सोबतच अलिबाग येथील चुंबकीय वेधशाळा भागाचीही पाहणी करतील. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाबातच्या आढाव बैठकीलाही त्यांची उपस्थिती असेल.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
-उद्धव ठाकरेंनी नेतृत्व कसं करायचं असतं हे दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात
-चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटात मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!
“दानशूर उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”
-“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”