आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई |  आजच्या बुद्ध पोर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी बुद्धाच्या तत्वज्ञान सांगत शुभेच्छा संदेशात आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो, असं म्हटलं आहे.

बुद्धांची शिकवण अनुसरण्यातूनच आपण आज निर्माण झालेल्या मोठ्या संकटावरही मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो. त्यांच्या संबोधी– ज्ञानाची आज जगाला नितांत गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व ते दूर करण्याचे ज्ञान प्राप्त झाले. मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग व तपश्चर्या केली सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांनी तथागत बुद्धांना त्रिवार वंदन केलं आहे.

उद्धव ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व ते दूर करण्याचे ज्ञान प्राप्त झाले.मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग व तपश्चर्या केली. त्यांच्या संबोधी– ज्ञानाची आज जगाला नितांत गरज आहे. बुद्धांची शिकवण अनुसरण्यातूनच आपण आज निर्माण झालेल्या मोठ्या संकटावरही मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो. त्यासाठी बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा आणि तथागत बुद्धांना त्रिवार वंदन”

 

महत्वाच्या बातम्या-

-‘राज’पुत्राचा मुख्यमंत्र्यांना फोन; उद्धव यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद

-बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-कालच्या प्रकारावर देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, छत्रपती संभाजीराजेंची मागणी

-मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीस राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना केलं निमंत्रित

-फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील त्या वादग्रस्त ट्विटवर; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया