‘…तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार’; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई | 31 तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाउनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. मात्र एकदम लॉकडाउन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे.  हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

दुकनं, उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यातलं अर्थचक्र कसं चालणार यावरही आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच 75 ते 80 टक्के कापूस खरेदीचाही विचार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

सध्या महाराष्ट्रात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत. लॉकडाउन एकदम करणं हे जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाउन एकदम उठवणंही चुकीचं ठरेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘एक वेळ माझा गळा चिरा, पण…’; ममता बॅनर्जी आक्रमक

-‘हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नका’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

-‘जो मोदी जी की आरती गावे….’; ‘या’ भाजप मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लाँच

-“केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?”

-जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत- उद्धव ठाकरे