मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, ‘ही’ महत्त्वाची केली मागणी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी मेडिकल क्षेत्रातील  एमडी आणि एमएसच्या परिक्षा पुढे ढकलल्या जाव्या अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.

येत्या 15 जुलैपासून एमडी आणि एमएसच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शेवटच्या वर्षाचे निवासी डॉक्टर सध्या कोरोनाच्या परिस्थिती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे एमडी/एमएसच्या परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यासंबंधी मध्यस्थी करत इंडियन मेडिकल काऊंसिलला आदेश द्यावे,” अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलीये.

 

 

“सध्या कोरोनाच्या परिस्थितीत रूग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टरांची फार आवश्यकता आहे. त्यामुळे जर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडली तर सध्याच्या परिस्थितीत प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासण्याची शक्यता आहे,” असंही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

एमडी आणि एमएसच्या परिक्षांसोबत डीएम – एमसीएच यांच्या परिक्षा देखील डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

-केंद्र आणि राज्य सरकार भिकारी, लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले- प्रकाश आंबेडकर

-राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीये, त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ- निलेश राणे