अयोध्या | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की “मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी मुख्यमंत्री होईन”.
मी ज्यावेळी अयोध्येला येतो त्यावेळी काहीतरी यश घेऊन प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला येतो. गेल्या वेळी नोव्हेंबर महिन्यात मी अयोध्येला आलो होतो आणि त्याच महिन्यात मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आता आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून मी प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला अयोध्येत जमीन द्यावी. आम्ही राम भक्तांसाठी महाराष्ट्र भक्त निवास उभारू, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेतर्फे 1 कोटी रूपये देणार असल्याचं घोषित केलं.
दुसरीकडे आमची छाती जरी फाडली तरी आमच्या छातीत राम दिसेल आम्हाला दिखाव्याची गरज नाही, या चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला त्यांनी आम्ही भाजपला सोडलंय हिंदुत्व नाही, असं खास टोला लगावत त्यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं.
महत्वाच्या बातम्या-
मी भाजपला सोडलंय… हिंदुत्वाला नाही- उद्धव ठाकरे
-शिवसेनेच्या वतीने राम मंदिरासाठी 1 कोटी रूपये देणार- उद्धव ठाकरे
-आमची छाती जरी फाडली तरी रामच दिसेल- चंद्रकांत पाटील
-राज्यसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस
-काय आश्चर्य ना… येस बँकेवर निर्बंध येण्या आधी गुजरातच्या बँकेने काढून घेतले 265 कोटी