उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर; तर राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई | सध्या राज्यात थंडीची लाट आली आहे. मात्र हवामानाच्या बदलत्या रुपांमुळे ऋतूंवर परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता हिवाळा सुरु झाला असून ऐन हिवाळ्यातही अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळतंय.

मागील आठवड्यापासून उत्तर भारतात गारठा वाढला होता. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यातील पारा पुन्हा वाढल्याचं पहायला मिळतंय.

वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र चांगलाच गारठला होता. मात्र आता हळूहळू थंडीही कमी व्हायला लागली आहे. थंडी कमी होत असली तरी काही ठिकाणी अजूनही पाऊस कोसळत आहे.

मध्य भारतात काही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आह. त्यामुळे आता मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात बुधवारी रात्री तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती मिळाली होती. तर आज पूर्व विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लाखांदूर, साकोली, तुमसर आणि लाखनी या भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

विदर्भात पावसाची शक्यता असली तरी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कहर कायम असल्याचं पहायला मिळतंय. पुण्याचं तापमान आज 10 अंशावर गेल्याचं पहायला मिळालं होतं.

दरम्यान, बदलत्या हवामानामुळे शेतीला मोठा फटका बसत असल्याचं चित्र मागील काही वर्षापासून पहायला मिळत आहे. त्यामुळे आता करावं तरी काय?, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 14 लाख

काय सांगता! रणबीर-आलियाचं लग्न झालंय?; आलिया स्वत: म्हणाली…

“मुलींनी स्कर्ट घालणं त्यांना नकोय, जीन्स घालणं नकोय, मग एखादं…”; आव्हाडांनी सुचवला पर्याय

“मला विद्या बालनसोबत ‘तो’ हाॅट सीन करायचाय”, अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

“तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये…”; हिजाब वादात कंगना रणौतनची उडी