लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

मुंबई | लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे चार कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी 3 कोटी 97 लाख 87 हजार 644 रुपयांचा दंड वसूल केला आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा असं वारंवार सांगितलं जात असतानाही अनेकांनी ते पाळले नाहीत. त्यामुळे आत्तापर्यंत 19 हजार 838 जणांना अटक झाली आहे. तसेच 56 हजार 473 वाहनं जप्त करण्यात आली आहेत, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

लॉकडाउनच्या काळात अवैध वाहतुकीची 1 हजार 291 प्रकरणं समोर आली आहेत. तर पोलिसांवर हल्ले झाल्याच्या 212 घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत 750 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिलीये.

दरम्यान, सध्या राज्यात 2 लाख 58 हजार 792 जण क्वारंटाइन आहेत, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?; वाचा संपूर्ण माहिती

-“कोरोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल”

-राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार

-गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोराना एकही नवा रुग्ण आढळला नाही