मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच देशातील कोरोना आणि ओमिक्राॅन आकडेवारी पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध लावले होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अशातच आता कोरोना रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने मुलांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून शाळा आणि महाविद्यालये खुली करावी, यासाठी भाजपने आंदोलने केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाविद्यालये खुली करताना काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना नियमांचं पालन करावं लागणार आहे. दुसरीकडे दोन्ही डोस न झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रवादीने फोडला काँग्रेसचा गड! तब्बल 27 नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
राहुलची कर्णधार म्हणून काराकिर्द संपुष्टात?, बीसीसीआय अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य
‘लेडी सेहवाग’चा जलवा बरकरार! पुन्हा जागतिक क्रमवारीत गाठलं अव्वल स्थान
“किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य