‘मेसेजवरुन धमक्या कसल्या देताय दम असेल तर समोर या’, धमक्या देणाऱ्याला अभिनेत्रीचं आव्हान

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेञी शेहनाज गिल ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेञी म्हणून ओळखली जाते. शेहनाज प्रसिद्ध गायक, मॉडेल आणि अभिनेञी असून तिच्या अनेक चाहत्यांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहे. ती सोशल मीडियावर खूप अॉक्टीव राहते. तिचे इंन्टाग्रामवर 7.2 मिलियनहून अधिक फॉलोवर्स असून ती नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओ मुळे चर्चेत येत असते. माञ तिच्या एका पोस्टने काही नेटकरी तिच्यावर संतापले होते.

शेहनाज आपल्या अभिनयाबरोबरचं सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकत्याच एका पोस्टमुळे काही प्रेक्षक चिडले असून तिच्यावर अॉसिड हल्ला करण्याची धमकी दिली होती. तसेच जोरदार टिका करत सोशल मीडियावर तिचे मॉर्पेड व्हिडिओ देखील आले होते.

सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग असलेली शेहनाज पंजाबची ‘कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाते. ती सतत छोट्या पडद्यावर सक्रिय असते. पण अलीकडे तिला आलेल्या धमकीमुळे आणि इंटरनेटवरील मॉर्पेड व्हिडिओमुळे तिने तिचं मौन मोडल आहे. ती सतत छोट्या पडद्यावर सक्रिय असते.

नुकत्याच बॉलीवूड हंगामाला झालेल्या मुलाखतीमध्ये तिला धमक्यांबद्दल प्रतिक्रिया विचारल्या, यावर शेहनाज म्हणाली, जे लोक अशा धमक्या देत आहेत, त्यांचे मी आभार मानते. तुमच्या या वागण्याने मला अधिकचं सहानुभुती मिळत माझ्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाहीये. त्याउलट चांगलचं होतय.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शेहनाज म्हणाली, अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. द्यायचीच असेल तर समोर येऊन दमकी द्या. मेसेजवरुन धमक्या कसल्या देताय दम असेल तर समोर या. तुमच्या या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही आणि याचा माझ्यावर काही सुद्दा परिणाम होत नाही.

माञ, या टिकेकरांच्या या धमक्यांना ती बिथरली नाही. तिनं देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यापुढे ती म्हणाली माझ्यावर प्रेम करणारे अनेक माझे लाखो चाहते आहेत. माझे मिञ,मैञिणी आहेत तसेच माझे नातेवाईक पण आहे मी त्यांचाकडे लक्ष देते. त्यामुळे अशा धमक्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये.

खऱ्या अर्थाने शेहनाज ‘बिग बॉस 13’ मुळे चमकली गेली. नुकताच 5 मार्चला ‘फ्लाय’ या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. यामध्ये ती आणि प्रसिद्ध रॅपर बादशहा यांनी काम केलेले दिसते.

महत्वाच्या बातम्या –

दहावी, बारावीच्या 50 हजारांहून अधिक विद्यार्थांचा ऑफलाईन परीक्षेला नकार…..

    अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

      जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ ठिकाणी करणार लग्न

        बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण?; रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले…

          हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री! ‘या’ व्यापाऱ्याची ऑफर