लगोलग निघा! 31st निमित्त पुण्यातील ‘हे’ महत्त्वाचे रस्ते होणार बंद

पुणे | नवीन वर्ष (New Year) 2022 अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2021 ला निरोप देण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.  अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रात्री 9 नंतर नाईट कर्फ्यू लावला आहे.

नाईट कर्फ्यू असल्याने आज 31 डिसेंबरला जुन्या वर्षाला निरोप देताना 9 नंतर बाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

आज पुण्यातील महत्त्वाचे रस्ते रात्री नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास पर्यटक, हॉटेल, कॉटेज, लॉज, हॉल व्यवसायिकांनाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

31st च्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतूकीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता देेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक म्हणजेच गुडलक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, जंगली महाराज रस्ता बंद असणार आहे.

झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, महात्मा गांधी रस्ता त्याचबरोबर हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक बंद असणार आहेत.

आज सायंकाळी 7 वाजतापासून ते उद्या सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत हे रस्ते नो व्हेईलल झोन (No Vehicle Zone) करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर शनिवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिराचा परिसर नो व्हेईकल झोन असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

“अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका

 चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल

‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत