इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलचा मोठा खुलासा

अहमदनगर |  पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगणारे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज चांगलेच अडचणात आले होते. तृप्ती देसाई यांच्यासह अंनिस इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. मात्र आज सायबर सेलने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे.

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त कीर्तनाचा व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध नसलयाचं सायबर सेलने म्हटलं आहे.  सायबर सेलच्या या स्पष्टीकरणानंतर इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मानण्यात येत आहे.

पीसीपीएनडीटी अ‌ॅक्टनुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती. त्यांनी त्या नोटीसीला उत्तर देताना आपण तसं कीर्तन केलंच नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सायबर सेलने त्या वादग्रस्त कीर्तनाचा व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध नाही, असं स्पष्ट करत इंदोरीकर महाराज यांना मोठा दिलासा दिलेला आहे.

दरम्यान, रविवारी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले गावाने बंदचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. तसंच राज्यभरातून देखील महाराजांना मोठा पाठिंबा मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकरांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादात आता शिवप्रतिष्ठानची उडी!

-इंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर!

-नकळत बोलून गेले असतील… त्याचं इतकं काय भांडवल करता?- सिंधुताई सपकाळ

-“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी कुत्री होणार”

-दाणादाण उडालेल्या दिल्ली काँग्रेसची धुरा आता ‘या’ महिल्या नेत्यावर?