दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या संख्येत ‘इतक्या’ पटीनं घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेल्या काही वर्षामध्ये कोरोना महासाथीच्या रोगानं जनजीवन विस्कळीत करुन टाकलं आहे. आता कुठे कोरोना आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे.

देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे. हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक परिस्थिती पहायला मिळत आहे.

आज राज्यात एक हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे संख्येत घट होत असलेली जाणवत आहे.

तीन हजार 375 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत सहा रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्क्यांवर गेल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेनं धडक दिली असून तिसरी लाटही नियंत्रणात येत आहे. कोरोनाचं सावट कमी होताना पाहून निर्बंधांमध्येही शिथिलता केली आहे.

कोरोनाला आटोक्यात येताना पाहून राज्यात लवकरच अनलाॅक करण्यात येणार असं चित्र दिसतंय. काही दिवसांत परिस्थितीचा आढावा घेत राज्य सरकारही अनलाॅकचे निर्देश देणार आहे.

मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सर्व नियम काढून टाकण्यात येणार असल्याचा सूचक इशारा सरकारनं दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “तिसऱ्या आघाडीनं काहीही फरक पडत नाही, येणार तर मोदीच”

  “देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा”

  Uddhav Thackeray: “सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही”

  “उद्धव साहेब, सनम हम तो डूबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”

  मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना