वाशिम | कोरोनाचं सावट गेल्या दोन वर्षापासून घोंगावत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक संशोधन केलं जात आहेत. अशातच सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आत्ता कुठे नियंत्रणात आली वाटत असताना कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या बदलत्या रुपामुळे चिंतेचं वातावण निर्माण झालं आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे.
लसीकरणमामुळे बऱ्यापैकी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधून कोरोना मोठ्या प्रमाणावर नाहीसा झालाय. अशातच आता वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचं आलं आहे.
वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तब्बल 20 महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सुटकेचा श्वास सोडला आहे. आता हळूहळू राज्यातील सगळेच जिल्हे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचं चित्र आहे.
अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पूर्णपणे गेला नसला तरी कमी झाला आहे. नागरिक पुढाकार घेत लस घेण्यासाठी समोर येत आहेत. काही ठिकाणी मात्र अजूनही लस घेण्यासाठी प्रोत्साहित कराव लागत असल्याचं चित्र आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. या व्हायरसनं लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजुनही भारतात कोरोनाची दुसरी लाट असल्यानं परिस्थिती गंभीर आहे.
जवळजवळ कोरोनाला आता दोन वर्ष झाले. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी सतर्कता बाळगली जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आत्तापासूनच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार”
हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद
“अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा