दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव झालं कोरोनामुक्त

काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने राज्यात काही निर्बंधही लागू केले आहेत. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच 15 एप्रिलपर्यंत राज्यातील केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आधीच्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट खूपच भयंकर असल्याचं दिसतं आहे. रोजच्या वाढत्या रूग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रनेवर खूप ताण आला आहे.

बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करता येत नाहीय. रूग्णांची गैरसोय होत आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागांत कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

खानदेशातील एक गाव संपूर्ण कोरोनामुक्त झालं आहे. या गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जळगाव खानदेशातील हे गाव हॉट्स पॉट होते. मात्र आता हे गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झालं असल्यामुळे सर्वत्र या गावाची चर्चा सुरू झाली आहे.  जळगावातील भुसावळ येथील साकेगाव असं कोरोना मुक्त झालेल्या गावाचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी साकेगावमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. मार्च महिन्यात तर या गावात शंभरहून अधिक रुग्ण सापडले होते.  सुरुवातील गावातील लोक भितीमुळे कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत नव्हते मात्र ग्रामपंचायत कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली.

त्यादरम्यान जे लोक पॉझिटिव्ह आले त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं. तसेच गावात वेळोवेळी औषध व सॅनिटायझरची फरवारणी करण्यात येत होती.

दरम्यान, साकेगावाची लोकसंख्या जवळपास ८ हजार इतकी आहे. हे गाव कोरोनावर मात करण्याच्या उत्तम कामगिरीसाठी साकेगाव ग्रामपंचायतीला २४ हजारांचे बक्षीसही देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

शेतातील नांगरणीवरून दोन भावांमध्ये वाद; कोरोनाबाधित रूग्णानं…

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…

पिसाळलेल्या हात्तीने गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला…

समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय…