टीका करण्यापेक्षा सहकार्य करा; तुकाराम मुंढेंचा नागपुरच्या महापौरांवर निशाणा

नागपूर |  नागपुरमध्ये वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याला महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे आणि प्रशासनाला जबाबदार धरलं होतं. मात्र आयुक्तांच्या एका निर्णयाने नागपूरचा समूह संसर्गाचा धोका टळल्याने नागपुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आयुक्तांनी देखील हाच मोका बघून नागपुरच्या महापौरांवर निशाणा साधला आहे.

निर्णयावर टीका करण्यापेक्षा निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करा, असं म्हणत तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागपुरात गेल्या दोन दिवसात एकूण 100 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. नागपूरसाठी ही अत्यंत वाईट बातमी असली तरी जर काही कठोर पावले उचलली नसती तर यापेक्षा भयंकर काहीतरी नागपूरकरांना ऐकावे लागले असते. दोन दिवसात आढळलेल्या 100 रुग्णांच्या बाबतीत अभ्यास केला तर त्यातील 85 रुग्ण मोमीनपुरा येथील, 12 रुग्ण सतरंजीपुरा या हॉटस्पॉटमधील आणि जरीपटका, गणेशपेठ, ताजबाग परिसरातील प्रत्येकी एक व्यक्ती आहे. विशेष म्हणजे, या सर्व व्यक्तींपैकी केवळ एक व्यक्तीचा अपवाद वगळता सर्वच्या सर्व विलगीकरणात होते. त्यामुळे नागपुरमधला मोठा टळला आहे.

सतरंजीपुरा आणि मोमीनपुऱ्यात प्रारंभी रुग्ण आढळल्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना सक्तीने अलगीकरण करण्याचा निर्णय घेतला नसता, टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली नसती, प्रतिबंधित परिसरातील बंदोबस्त कडक केला नसता तर आज समूह संसर्गाचा उद्रेक झाला असता, एवढे मात्र निश्चित…! म्हणूनच टाळेबंदीचे पालन करा…संपर्काची माहिती द्या…लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करा…घाबरू नका…स्वतःहून पुढे या आणि करोनाची साखळी खंडित करण्यासाठी मदत करा… असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्रावरचा अन्याय तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही राजकारण करण्यास नालायक आहात”

-लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत ‘या’ अभिनेत्यासोबत पार पडला अरूण गवळीच्या लेकीचा लग्नसोहळा

-“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”

-दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना

-पतीची कामगिरी खराब झाली तरी दोष पत्नीवरच येतो- सानिया मिर्झा