‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

मुंबई | एका शेअरने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना मालामाल केलंय. गुंतवणूकदारांना मालामाल करणारे हे शेअर्स EKI एनर्जी सर्व्हिसेसचे आहेत. कंपनीच्या शेअर्सने 10 महिन्यांत लोकांना 6500 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.

EKI एनर्जी सर्व्हिसेसने (EKI Energy Services) गेल्या वर्षी त्यांचा IPO आणला होता. कंपनीने गुंतवणूकदारांना 102 रुपये किमतीला शेअर्स अलॉट केले होते. EKI एनर्जी सर्व्हिसेस हे कार्बन क्रेडिट डेव्हलपर आणि सप्लायर (supplier) आहेत.

7 एप्रिल 2021 रोजी EKI एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 147 रुपयांच्या स्तरावर होते. तर आज 14 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 9700 रुपयांच्या स्तरावर आहेत.

कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 10 महिन्यांत सुमारे 6600 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 7 एप्रिल 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्या एक लाख रुपयांचे तब्बल 66 लाख रुपये झाले असते.

कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12,599.95 रुपये आहे. तर 52 आठवड्यांसाठी कमीत कमी किंमत 140 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 6,554 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

कंपनीच्या शेअर्सने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 521 टक्के रिटर्न दिला आहे. ज्या व्यक्तीने 16 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्या व्यक्तीच्या एक लाख रुपयांचे आता 6.18 लाख रुपये झाले असतील.

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 687.82 कोटी रुपये होता आणि कंपनीचा नफा 161.21 कोटी रुपये होता. अशाप्रकारे ज्या लोकांनी EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. ते वर्षभरात मालामाल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका