तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणं स्वरा भास्करला महागात पडलं, FIR दाखल?

मुंबई | अफगाणिस्तान देशाबद्दल सध्या जगभर चर्चा चालू आहे. देशातील बहुतांश भाग हा तालिबानी सैन्याने काबीज केला आहे. यामुळे अफगाणिस्तान मधील सामान्य नागरिकांमध्ये भितीचं वातावरणा तयार झालं आहे. जगभरात याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतातून देखील याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या तालिबान्यांशी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने हिंदुत्वाची तुलना केली आहे. मात्र, हे तिच्या चांगलंच अंगलट आलं आहे. स्वराने याबद्दल एक ट्वीट केलं आहे. परंतु या ट्वीटमुळे आता स्वराविरुद्ध FIR दाखल होण्याची शक्यता आहे.

स्वराच्या या ट्वीटनंतर अनेकांनी स्वराला शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दिल्लीतील वकील अशोक चैतन्य यांनी दिल्लीतील द्वारकानाथ पोलीस स्टेशनमध्ये स्वराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याविषयी अशोक यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मी स्वराविरुद्ध प्राथमिक तक्रार दाखल केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. कारण स्वराने ट्वीटमध्ये हिंदूंना आतंकवादी म्हटलं आहे.

स्वरा तिच्या बेधडक वक्तव्यामुळे ओळखली जाते. कोणत्याही परिस्थितीवर ती बिनधास्तपणे बोलताना दिसते. यामुळे कित्येकवेळा तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं आहे. यापुर्वी देखील तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिच्यावर अनेकदा टीका झाली आहे.

आता हे ट्वीट देखील स्वराच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ट्वीटरवर #ArrestSwaraBhaskar असा हॅशटॅग ट्रेेंड होत आहे. याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सध्या अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसत आहे. अफगाणी लोकांना वाचवण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यामध्ये देखील तालिबानच्या परिस्थितीवरुन चर्चा पार पडली. अफगाणी लोकांना मदत करण्याचे आश्वासन या दोन्ही नेत्यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंडोममध्ये सोनं घालून महिलांनी अशा जागी लपवलं की पाहून मुंबई पोलीसही चक्रावले!

संतापलेल्या ऐश्वर्याने ‘या’ कारणाने अभिषेकला दोन रात्री ठेवलेलं रुमबाहेर

पाकने माधुरी दीक्षित यांना मागितल्यानंतर ‘शेरशाह’ बत्रांनी दिलेल्या उत्तराने शत्रू हादरले होते

नेहा कक्कर लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? व्हिडीओतून झालं अघड

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरंच विवाह बंधनात अडकणार? अभिनेत्रीची टीम म्हणाली…