Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

ड्र.ग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार; ‘या’ सात बड्या कलाकारांची नावं गोत्यात!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह अनेकांना एनसीबीनं याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील इतरही काही दिग्गज अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता अं.मली पदार्थ प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

शिरोमणी अकाली दल प्रमुख मनजिंदर सिंह सिरसा यांनी बॉलिवूड मधील सात कलाकारांविरुद्ध गु.न्हा दाखल केला आहे. मनजिंदर सिंह सिरसा यांनी एका जुन्या पार्टीच्या व्हिडओचा आधार घेत हा गु.न्हा दाखल केला आहे.  या पार्टीमध्ये ड्र.ग्जचा सर्रास वापर केला गेला होता, असा आरोप मनजिंदर सिंह यांनी केला आहे.

मनजिंदर सिंह यांनी याप्रकरणी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, मलाइका अरोरा, दीपिका पदुकोन, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, विकी कौशल आणि वरून धवनसह इतरही काही कलाकारांची नावे घेतली आहेत. मनजिंदर सिंह यांनी याप्रकरणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना यांची देखील दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवरून माहिती दिली आहे.

मनजिंदर सिंह यांनी राकेश अस्थाना यांना संबंधित बॉलिवूड कलाकारांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्या दिवशीच्या पार्टीचीही चौकशी व्हावी, अशीही मागणी मनजिंदर सिंह यांनी केली आहे. मनजिंदर सिंह यांनी या ट्वीटसोबत काही कागदपत्रही सादर केली आहेत.

मनजिंदर सिंह यांनी तक्रार दाखल करण्यापूर्वी ट्वीटरवरून एक व्हिडीओही शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दिसणारे चेहरे तुम्हाला लवकरच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर रांगेत उभे राहिलेले दिसतील, असा कॅप्शन मनजिंदर सिंह यांनी या व्हिडीओला दिला होता.

दरम्यान, या मंडळींनाही लवकरच तु.रुंगात जाव लागणार आहे, असंही मनजिंदर सिंह यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. मनजिंदर सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर एनसीबी कोणतं पाऊल उचलतेय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिशाचा मित्र गायब आहे का?; सेक्युरिटी गार्डनं केला मोठा खुलासा

अंकिता लोखंडेवर भडकले चाहते; ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

संबित पात्रांनी विचारला POK चा फुलफॉर्म; ‘या’ अभिनेत्रीला देता आलं नाही उत्तर!

सुशांत प्रकरणी शौविकनं अखेर मौन सोडलं; ‘या’ व्यक्तींच्या नावाचा खुलासा करत दिली महत्वाची माहिती

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या फार्महाऊसवर रियापूर्वी ‘ही’ अभिनेत्री येत होती