Top news देश

लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

मुंबई |  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने देशात कर्फ्यू लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याचे ठेले, अन्नधान्याची दुकाने तसंच मेडिकल शॉप्समध्ये गर्दी करत आहेत. याच काळात कंडोमच्या मागणीत आणि विक्रीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

इतर वेळी ग्राहक कमी संख्येने कंडोम खरेदी करतात म्हणजे तीन कंडोमचं पॅकेट खरेदी करतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत जास्त संख्येने कंडोम असणाऱ्या पॅकेट्सची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. तसंच गेल्या 10 दिवसांत कंडोमची विक्री 25 ते 50 टक्क्यांनी वाढली आहे.

कंडोमप्रमाणेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीचं प्रमाण देखील वाढलं असल्याचं निरीक्षण मेडिकलने नोंदवलं आहे.या गोष्टींचा खप मागील एक आठवड्यांपासून कमालीचा वाढला आहे. खास करुन मॉल्स बंद झाल्यापासून या गोष्टी मेडिकलमधून खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं आहे, असं दिल्लीच्या एका औषध विक्रेत्याने सांगितलं आहे.

अनेक सार्वजनिक ठिकाणी उदा. मॉल्स, चित्रपटगृह, नाटकगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद आहेत. अनेल लोकांना खासगी कंपन्यांनी घरून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेकजण घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करण्याकडे अनेकांचा कलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोनाच्या भीषण संकटात सानिया मिर्झा गरिबांना करणार मदत

-हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु- उद्धव ठाकरे

-हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

-पोलिसांनी तेल लावून लाठी वापरावी- अनिल देशमुख

-…तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ!