ईडीवरून गोंधळ सुरूच! संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये सातत्यानं विविध विषयांवरून जोरदार वाद होताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून अगोदरच राऊतांनी भाजपला शिंगावर घेतलेलं आहे. अशात आता भोंग्यांचा विषय राज्यात जोर धरू लागला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत. राज्यात त्यांनी हौदोस घातलाय, या बेकायदेशीर आणि बेईमानी कारवाया आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकरणांचा उल्लेख करत राऊतांनी भाजपला जोरदार फटके लगावले आहेत. परिणामी राज्यात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

आता संयम संपलेला आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एक्शन मोडमध्ये आहेत, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला आहे. मलिक आणि देशमुखांच्या केसेस या खोट्या पायावर उभ्या आहेत, असंही राऊत म्हणाले आहेत.

जुन्या काळातील कोणतंही प्रकरण बाहेर काढायचा आणि त्रास द्यायचा हे धोरण सध्या केंद्र सरकारनं स्विकारलं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

अनिल देशमुखांच्या 6 वर्षांच्या नातीची चौकशी करण्यात यावी, इतक्या नीच पातळीवर सध्या राजकारण सुरू आहे. राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात चालू असणारा संघर्ष संपणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांना देखील काही दिवसांपूर्वी ईडीच्या मोठ्या कारवाईचा सामना करावा लागला होता. राऊत यांच्या मुंबई आणि कोकणातील संपत्तीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!