विधान परिषद निवडणुकीदरम्यानचा गोंधळ दिल्ली दरबारी; ‘या’ 3 काँग्रेस नेत्यांना हायकमांडने झापलं

नवी दिल्ली | नागपूर विधानपरिषद निवडणुकी दरम्यान झालेला गोंधळ दिल्ली दरबारी गेल्याचं कळतंय. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांना हायकमांडने बोलावल्याची माहिती आहे.

नागपूर विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. या गोंधळाच्या मुद्द्यावर काँग्रेस हायकमांडने प्रमुख नेत्यांना समन्स दिल्याचं कळतंय.

हायकमांडकडून बोलावणं आल्यामुळे हे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये एकमत नसल्यामुळे त्याबाबत खुलासा करण्यासाठी दिल्लीत पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळतेय. संध्याकाळी 7 वाजता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी ही बैठक होणार आहे.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. महत्वाची बाब म्हणजे यावेळी महाविकास आघाडीचीही मत फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत बावनकुळे यांना 362 मतं मिळाली.

काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 तर भाजपकडून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळालं. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 16 मतं फुटल्याचं समजतं.

दरम्यान ,उमेदवार बदलविल्यानं छोटू भोयर नाराज झालेत. पण, पक्षानं दिलेला निर्णय त्यांनी मान्य केला. भोयर यांनी भाजपला आधीच बाय-बाय केलं होतं. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करू, असं त्यांनी सांगितलं. पण, आता त्यांची घुसमट होणार आहे. ना काँग्रेस ना भाजप अशीच त्यांची अवस्था झाली आहे.

काँग्रेस पक्षानं मतं न दिल्यानं ते महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मनापासून प्रचार करतील, असं वाटत नाही. त्यामुळं काँग्रेसला मनपा निवडणुकीत त्यांचा हवा तसा फायदा होणार नाही, असंच दिसतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं” 

पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, बड्या भाजप नेत्याला अटक झाल्याने खळबळ 

“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार” 

कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही”