मुंबई | आपल्या अष्टपैलू अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. अमेरिकेत राहून देखील तिच्या नजरा मराठी चित्रपटांवर खिळलेल्या असतात.
हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटांवर प्रेम करणारी प्रियंका प्रत्येक चित्रपटाला यश मिळावं म्हणून शुभेच्छा देते. अशात तिनं चंद्रमुखी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी चित्रपट येत्या 29 एप्रिलला सर्वांच्या भेटीला येत आहे. परिणामी प्रियांकाची टिपण्णी महत्त्वाची आहे.
सध्या चंद्रमुखी चित्रपटातील गाणी, टीझर, ट्रेलर, पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. अमृता खानविलकर ही या चित्रपटात नृत्यांगणेच्या भूमिकेत असणार आहे.
दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे असणार आहे. परिणामी सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. अशात या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रानं देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चंद्रमुखीचं पोस्टर शेअर केलं आहे. त्याचबरोबर प्रियांकानं आदिनाथ कोठारेचं देखील अभिनंदन केलं आहे.
येत्या 29 एप्रिलला चंद्रमुखी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, असं कॅप्शन प्रियंकानं दिलं आहे. चंद्रमुखी चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते प्रसाद ओक यांनी केलं आहे.
दरम्यान, चंद्रमुखी चित्रपटात अमृतानं आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. चित्रपटाला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ
अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर
रक्त की टोमॅटो सॉस?; सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर
“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केलं नाही तर लोक मारतील”
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर