सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय- फडणवीस

मुंबई |  काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लेख लिहिण्यात आला आहे. हा लेख अपमानित करणारा आहे. सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय, असा गंभीर आरोप करत याप्रकरणी काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सावरकरांना स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर संबोधलं गेलं आहे. सावरकरांवर लांछनास्पद लिखाण केलं गेलं आहे, यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही फडणवीसांनी यावेळी केली आहे.

सावरकरांवर गलिच्छ लिखाण करणाऱ्यांचा तसंच बिनडोक लिखाण करणाऱ्यांचा जितकाही निषेध करावं तितका कमीच आहे. शिदोरी मासिक काँग्रेसने परत घेतलं पाहिजे तसंच त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सावरकरांवरच्या गलिच्छ लिखाणाप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना स्वत: पत्र लिहिणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-क्षणिक आणि आभासी सुखाच्या मागे धावू नका; राजू शेट्टींचा शेतकरी मुलींना सल्ला

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र

-आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?; सय्यदभाईंचा सरकारला सवाल

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र