Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

malegoan nc e1643280948438
Photo Credit- twitter/@NCPspeaks

मालेगाव | आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. त्यामुळे आता स्थानिक राजकारणात देखील वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय. (Malegaon Mayor including 27 Congress corporators join NCP)

राज्यात महाविकास आघाडी एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्येच जुंपल्याचं पहायला मिळतंय.

अशातच आता मालेगावात काँग्रेसला मोठं भगदाड पडल्याचं पहायला मिळतंय. मालेगावात राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतंय.

दोन दिवसांपूर्वी मालेगावात काँग्रेसच्या तब्बल 27 नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. मालेगावात सध्या काँग्रेसची सत्ता होती. मात्र, आता राष्ट्रवादीनेच काँग्रेस मोठा धक्का दिला आहे.

महापालिकेतील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार रशीद शेख यांनी सोडचिठ्ठी दिली आहे,. तर महापौर ताहिरा शेख यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे.

दरम्यान, पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यानंतर आता मालेगावात राष्ट्रवादीचं बहुमत सिद्ध होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”

 “तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”

“दोन व्यक्तींची मनं आता नितीन गडकरीच जुळवू शकतात”

न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत’; राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं