मोठी बातमी! काॅंग्रेसचा शिवसेनेवर तब्बल 24 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून जोरदार राजकारण पेटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका होणार हे नक्की आहे.

सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे सरकारला निर्देश दिले होते. त्यानंतर राज्यात ओबीसी आरक्षणावरून वाद वाढला आहे.

ओबीसी आरक्षणावरून वाद होत असतानाच आता मुंबई काॅंग्रेसनं महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ही यावेळी अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार असताना महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेला काॅंग्रेस शिवसेनेच्या अडचणी वाढवत आहे.

मुंबई महापालिकेत टीडीआर घोटाळा आणि सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्राचा 24 हजार कोटींचा घोटाळा झाल्याबाबत काॅंग्रेसनं लोकायुक्त, केंद्रीय दक्षता समिती, मुंबईचे महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे कळवलं आहे.

टीडीआर प्रक्रिया करताना विकासकांना फायदा करून दिल्याचा आरोप काॅंग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत काॅंग्रेस विरोधी पक्षात आहे.

चांदीवली, मुलंड पुर्व, माहिम, वरळी या भागातील विकास कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देखील राजा यांनी केला आहे. परिणामी आता नवा वाद उद्भवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 आयपीएलचा रोमांच! RCB च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत पण…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…