महाराष्ट्र

‘…तर खडसेंचं निश्चित स्वागत करु’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना खुली ऑफर दिली आहे. जर एकनाथ खडसे काँग्रेसचा विचार घ्यायला तयार असतील तर त्यांचं निश्चित स्वागत करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे हे एक समर्थ नेते आहेत. त्यांना मी 1990 सालापासून ओळखतो. नाथाभाऊ म्हणाले की मी त्यांना संपर्क केला होता. ते माझे जुने मित्र आहेत. आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत. खडसे हे जनमानस असलेला नेता आहे. जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन ते आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ऑफर दिल्याचा दावा यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याला आता बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. पण मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभं राहण्यास नकार दिला, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-तुमच्या प्रेमाला कधीच विसरणार नाही; ‘या’ दोघांसाठी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट

-…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा

-मोदींनी दिलेला आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

-पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!

-“उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी”