मुंबई | दोन लाख रोजगार आणि तेवढाच मोठा महसूल महाराष्ट्राला मिळवून देण्याची क्षमता असणारा वेदांता फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) सेमीकंडक्टर बनविणारा एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे.
त्यामुळे राज्यात सध्या मोठे राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आरोप करत आहेत, तर एकनाथ शिंदे यांचा गट महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत.
या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत, असे सावंत म्हणाले.
तसेच शिंदे यांच्या कर्तव्यशून्यतेमुळे आणि शिंदे – फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. तसेच केंद्राच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे देखील बोलले जात आहे.
हा प्रकल्प गुजरातला नेण्याने महाराष्ट्राचेच नाहीतर देशाचे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी आपली कंपनी बंद करत काढता पाय घेतला आहे, असेही सावंत म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना, नरेंद्र मोदी (Chief Minister Narendra Modi) यांनी अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन गुजरातचा हजारो कोटी पैसा पाण्यात घातला. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे.
तसेच नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेले. असे गंभीर आरोप सावंत यांनी मोदींवर केले आहेत. त्यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे.
पंतप्रधान यांच्यासोबत वेदांता प्रकल्पाची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“भाजपसोबत युती करताय, जरा जपून”; उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी इशारा
“देवी-देवतांनी मला सांगितले, डोन्ड वरी, जा भाजपमध्ये“
अजित पवार शिंदे गटावर संतापले; म्हणाले, “यांना आम्ही गद्दार म्हंटले की…”
“अजित पवारांना मुख्यमंत्री करा”, जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंद्यांना काय दिली ऑफर?
दसरा मेळावा वाद: युवासेनेचा शिंदे गटाला मोठा इशारा, म्हणाले शिवतीर्थ…