नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्रातील सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध करणारा सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस. याच पक्षातील राज्यसभेतील मुख्य प्रतोदांनी आपल्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे राज्यसभेचे मुख्य प्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कलितांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं.
राज्यसभेचे सोमवारचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच भुवनेश्वर यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट कलिता यांनी केलं आहे.
भुवनेश्वर कलिता हे काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद होते. राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांसाठी व्हीप काढण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. कलिता हे 2004 ते 2014 पर्यंत आसाम काँग्रेसचे समितीचे अध्यक्ष होते.
दरम्यान, कलिता यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार हे आणखी स्पष्ट झालं नाही. काँग्रेसने कलम 370 संदर्भात घेतलेल्या भूमिकेला कलिता यांचा विरोध होता. म्हणून त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच सहा शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन
-जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर काय होईल???
-ईव्हीएम गेलं तर भाजपही जाणार; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा
-“देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांनाही आवडला असणार!!!”