मुंबई | विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीये. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतायेत. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सरकारने 5 वर्षात केलेल्या कामावरून चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे.
महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर थापा मारणे आणि फेकाफेकी करणे एवढंच काम सरकारला येतंय. दुष्काळाचा प्रश्न असो की शेतकरी आत्महत्येचा… कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो की शालेय शिक्षणाचा… महागाईचा प्रश्न असो की बेरोजगारीचा अश्या सगळ्या आघाड्यांवर शासन फोल ठरलं आहे. सरकार फक्त थापा मारण्याचं काम करतंय, अशी टीका करत भाजपचा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असं काँग्रेसने म्हटलंय.
दुसरीकडे भाजप सरकारचं काम आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात उल्लेखनीय काम आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारने 5 वर्ष कामाचा धडाका लावला होता. याच कामाच्या बळावर भाजप-शिवसेना पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
आपण दोघे भोजन भाऊ… थापा मारू जिंकून येऊ. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखं करतो, अशा प्रकारची कारकीर्द भाजप-शिवसेनेची राहिलेली आहे, अशी बोचरी टीका करत काँग्रेसने भाजप-शिवसेनेना लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतल्या पराजयाने आम्ही खचलो नाही. आत्मपरीक्षण केलंय. आता विधानसभा निवडणुकीत सत्ता आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???
-जोर का झटका जरा धीरेसे देऊ; भाजपचे मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात- नाना पटोले
-आमदार फोडण्यासाठी भाजप लालच दाखवतं; ममता बँनर्जींचा आरोप
“आम्ही गटारं अन् शौचालयं साफ करायला खासदार झालो नाही”
-अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा