मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होणार आहे. या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हं आहेत. ‘सिटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार काँग्रेस विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार आहे.
आज 40 ते 50 जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती छानणी समितीचे सदस्य आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, प्रणिती शिंदे यांची नावं निश्चित मानली जात आहे.
पहिल्या यादीत काँग्रेसच्या काही विद्यमान आमदारांसह काही माजी आमदारांचीही नावे आहेत. आज पहिली यादी जाहीर झाल्यानंतर 26 तारखेला काॅंग्रेसची दुसरी यादी होणार आहे.
दरम्यान, आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ज्यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
धाकधूक वाढली… भाजप विद्यमान 25 आमदारांचं तिकीट कापणार?? https://t.co/LCFPCA3lC9 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
नाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा- शरद पवारhttps://t.co/W7yGRvfqNL @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
“वाघ दरवाजातून 144 जागा मागतोय… भाजप म्हणतंय फेकलेला तुकडा घ्या” https://t.co/HcCEoBwLj8 @kolhe_amol @Shivsena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019