प्रियंका गांधींचा हटके प्रचार! बाॅडीगार्डसह नेते, कार्यकर्ते रस्त्यावर धावले; पाहा व्हिडीओ

लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आता निर्णयक टप्प्यावर आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष आणि इतर स्थानिक पक्ष देखील जोरदार तयारीला लागले आहेत.

अशातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सोमवारी कुशीनगरमधील तमकुही राज येथे ट्राफिक जॅममध्ये अडकल्याचं पहायला मिळालं.

मतदानाची तारीख जवळ आल्याने तमकुही राजमध्ये मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर प्रियंका गांधी अजय कुमार लल्लू यांच्या घरी गेल्या होत्या.

जाहीर सभा संपल्यानंतर अजय कुमार लल्लू प्रियंका गांधी यांना त्यांच्या घरातून मोटरसायकलवरून हेलिपॅडवर सोडण्यासाठी गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली.

प्रियंका गांधी मोटरसायकलवरून जात असल्याचं लोकांना कळताच लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी लोकांचं अभिवादन देखील स्विकारलं.

दुसरीकडे प्रियांका गांधी यांनी आज बलियामध्ये रोड शो केला. यादरम्यान प्रियंका गांधींची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर दिसत होते.

लोकांनी त्यांचे फुलांचे हार घालून स्वागत केले. प्रियांकानेही हात जोडून लोकांचे अभिवादन स्वीकारले आणि काँग्रेससाठी मते मागितली.

दरम्यान, या सर्व गडबडीत प्रियंका गांधी यांना दीड तास उशिर झाल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. अखेर प्रियंका गांधी सुरक्षित हेलिपॅडजवळ पोहोचल्या.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

रशियाचं टेन्शन वाढलं! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली ‘त्या’ महत्त्वाच्या कागदावर सही

“राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा वयाचा विचार न करता धोतर फेडू”

संभाजीराजेंच्या हातून सुटलं संयोगिताराजेंचं उपोषण; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

“छत्रपतींचा अपमान करणारे छिंदम प्रवृत्तीचे लोक एकाच पक्षात कसे?”

सावधान! कोरोना अजून संपला नाही, लवकरच चौथी लाट येणार; तज्ज्ञांचा दावा