“काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे”

मुंबई | मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar) यांच्याशी देखील चर्चा केली. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावर सडकून टीका केली आहे. आता ममता बॅनर्जी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. देशातील जनता हे पहात आहे, असंही नान पटोलेंनी म्हटलंय.

वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी देखील ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे, असंही थोरात म्हणाले.

आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी 

मोठी बातमी! काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन 

“2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील असं…” 

प्रचंड मेहनत करुनही करिअरमध्ये यश मिळत नाहीये?, मग करा हे उपाय 

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं