कर्नाटकचं राजकीय नाट्य अखेर संपलं; कुमारस्वामी सरकार कोसळलं

बंगळुुरु : कर्नाटक सरकारचा गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळलं आहे. 

मोठ्या नाट्यमय घडामो़डीनंतर कर्नाटक विधानसभेत मतदान पार पडलं. त्यामध्ये काँग्रेस-जेडीएसचा 4 मतांनी पराभव झाला आहे. भाजपला 105 मत मिळाली तर काँग्रेस-जेडीएसला 99 मतं मिळाली आहेत.

काँग्रेस-जेडीएस सरकारचे 15 आमदार शेवटपर्यंत अनुपस्थितच राहिल्याने कुमारस्वामी सरकारला या नामुष्कीचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या 15 बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याचा कर्नाटक सरकारला चांगलाच फटका बसल्याचं दिसत आहे. 

भाजपचं मिशन कमळ यशस्वी झालं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळ्यानंतर भाजपला आता सत्तास्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठरावावर चर्चा करताना भावूक भाषण केलं. आपण अपघाताने मुख्यमंत्री झालो होतो. मी कधीही राजीनामा द्यायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 

बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी स्वत: कुमारस्वामींनी प्रयत्न केले होते. मात्र त्यात ते अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं. 

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या; धनंजय मुंडेंचं भावनिक आवाहन

-“नितीन गडकरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री”

-“भाजपने नाही तर बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला आला ‘हा’ खास मित्र

-त्या २ जागा द्या, नाहीतर नागपुरात मुख्यमंत्र्यांसह सर्व जागा पाडू; शिवसेनेचा इशारा