“सरकारी नोकरीसाठी मुलींना कुणाच्यातरी सोबत झोपावे लागते, तर मुलांना…” काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य….

नवी दिल्ली | भारत सध्या मोठ्या संकटांतून जात आहे. देशात वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती आणि बेकारी यामुळे जनता बेजार झाली आहे. अशातच देशात सत्तांतराचे आणि भ्रष्टाचाराचे वारे देखील वाहत आहेत.

तसेच नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत. अलिकडेच महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा (TET Scam) झाला. त्यानंतर कर्नाटकात नोकर भरती घोटाळा उघडकीस आल्याने तरुण आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत.

कर्नाटकातील घोटाळ्याची चौकशी सुरु असतानाच आता कर्नाटकातील काँग्रेसच्या (INC) एका मोठ्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मुलींंना एखाद्याच्यासोबत झोपावे लागते, असे ते म्हणाले आहेत.

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मुलींना एखाद्यासोबत झोपावे लागते, तर मुलांना मोठ्या प्रमाणात लाच द्यावी लागते, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी केले आहे.

प्रियांक खर्गे हे कर्नाटक काँग्रेस समितीचे प्रवक्ते आणि आमदार आहेत. त्यांनी नोकरीच्या बाबतीत मोठे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

कथित नोकरभरती (Government Recruitment) घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. अशा गंभीर प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी व्हावी आणि शासनाने जलद गतीने न्यायालये स्थापन करावीत अशा मागण्या देखील काँग्रेस करत आहे.

कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) साठी सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता आदी पदांसाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचे आरोप आहेत.

एकूण 1492 पदांसाठी भरती झाली होती यावेळी गोकाक येथील विद्यार्थ्याला परीक्षे दरम्यान गैरप्रकार करताना पकडले होते. एकूण 600 पदांसाठी अगोदरच उमेदवारांकडून लाच घेतली गेली होती, असा प्रकार उघडकीस आला होता.

महत्वाच्या बातम्या –

शिंदे गटाची पहिली शाखा उघडली, खासदारांच्या हस्ते उद्घाटन

प्रति शिवसेनाभवन बांधण्यावरुन उदय सामंतांचे स्पष्टीकरण

शिंदे आणि फडणवीस यांनी एक शब्द फेमस केला आहे, तो म्हणजे… – अजित पवार

आमच्याकडे पोलीस भाड्याने मिळतील, पोलीस स्टेशन सुद्धा बूक करु शकता

जात पडताळणी समितीचा समीर वानखडे यांच्याबाबत मोठा खुलासा