नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याभोवती सीबीआयने कारवाईचा फास आवळल्यानंतर चिदंबरम परागंदा झाले आहेत. सीबीआयची टीम मंगळवारी संध्याकाळी चिदंबरम यांना बेड्या ठोकण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती. मात्र ते घरात आढळले नाहीत. दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारत चिदंबरम यांना मोठा झटका दिल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची टांगती तलवार आहे.
दिल्ली हायकोर्टाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
आयएनएक्स मीडियाला परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळाकडून बेकायदेशीर पद्धतीने परवानगी मिळवून देण्यासाठी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आहे.
ईडी आणि सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आपण निर्दोष असून भाजप सरकार विनाकारण आपल्याला दशकभर जुन्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.
अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे चिदंबरम यांना ताब्यात घेण्याचे अधिकार तपास यंत्रणांना आहेत. सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या घराबाहेर त्यासंदर्भात नोटीस लावलेली आहे. मात्र, कायद्याच्या कोणत्या तरतुदी अंतर्गत माझ्या अशीलाला दोन तासाच्या आत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, याचा नोटिसीत उल्लेख नाही, असं उत्तर चिदंबरम यांच्या वतीने वकील अर्शदीप सिंह खुराना यांनी सीबीआयला दिलं आहे.
दिल्ली हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर तासाभरातच चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंतरिम जामीन अर्जाची मुदत संपल्यानंतर आणखी तीन दिवस मिळावेत, अशी मागणी पी चिदंबरम यांनी केली होती. सुप्रीम कोर्टानेही तात्काळ सुनावणीसाठी नकार देत वरिष्ठ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे बुधवारी ही याचिका मांडण्यास सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर???
-भारतीय संघात नाही पण ‘हा’ खेळाडू ‘या’ कारणामुळे असणार संघासोबत!
-ICC कसोटी क्रमवारी जाहीर; स्मिथचा कोहलीला दे धक्का??
-मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या ‘त्या’ पोस्टरवरुन भाजपविरोधात संताप
-शोएब अख्तरचे स्मिथबाबत ट्वीट; त्यावर युवराज म्हणतो…