…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांना निवेदन देत सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. यावरून काँग्रेस प्रेदशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.

भाजप नेते फक्त तक्रारीला राज्यपालांकडे जात आहेत. त्यांना त्याशिवाय काही जमत नाही. किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. त्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात, असं शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यावर टीकास्त्र सोडलंय.

भाजपला कायम खोटेपणा दिसून येतो. आधी सुरुवातीला काही झालं असेल पण आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात जेवढं काम होत नाही तेवढं आता राज्य सरकार करत आहे, असं थोरातांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्राचं पॅकेज म्हणजे झाडं लावा आधी मग त्यांना फळं येतील आणि त्यानंतर तुम्ही भूक भागवायची, अशी टीकाही थोरातांनी केंद्र सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…अन्यथा त्यांना कोरोनाविरोधात लढणारे योद्धे म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल

-तुम्ही कोणत्या झोनमध्ये? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

-“सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा”