मुंबई | सनातन संस्थेकडून महाराष्ट्रात दहशतवाद पसरवला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात देखील या संस्थेचा सहभाग आहे. यामुळे सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे.
राज्यात आता पुरोगामी विचारांचं सरकार आलं असून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात चूक केली होती. मात्र हे सरकार महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी अशा संस्थांवर बंदी घालण्याबाबत विचार करेल, असं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणात काही लोकांना विनाकारण गोवण्यात आलं आहे. या हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग होता. हे दोघेही दहशतवाद पसरवत आहेत त्यामुळे नव्या सरकारने यांच्याबाबतही भुमिका घ्यावी, असं दलवाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, छोट्या गुन्ह्यांमध्ये कोणी अनावश्यक अडकलं असेल तर त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करेल, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; संभाजीराजेंची मागणी – https://t.co/4gfahlFJ0o @YuvrajSambhaji #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी – https://t.co/VqR618AFUU #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
तब्बल 106 दिवसांनी पी. चिदंबरम येणार तिहार जेलबाहेर! – https://t.co/jRGBo9MKwu @PChidambaram_IN @INCMaharashtra #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019