महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस नेते नसीम खान यांचं तबलिगींबाबत मोठं वक्तव्य!

मुंबई | धारावी झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव तबलिगी जमातीमुळे झाला असं बोललं जात होतं. याला काँग्रेस नेते नसीम खान यांनीही दुजोरा दिला आहे.

नसीम खान यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन करतानाचाएक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी धारावीत तबलिगीं जमातीमुळे कोरोनाचा फैलाव झाला याला दुजोरा देणारं वक्तव्य केलं आहे.

लोकांनी घराबाहेर पडू नका. पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. तुम्ही घराबाहेर पडू नका. जर तुम्ही घराबाहेर पडलात, तर तुम्हालाही कोरोनाची लागण होईल, असं आवाहन नसीम खान यांनी केलं आहे.

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 377 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईचे आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-रामदास आठवलेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले…

-‘माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या’; दिवे पेटवण्यावरून कुमारस्वामींनी दिलं मोदींना आव्हान

-कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!

-कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

-दर्यादिल दादा… लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली