भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

सातारा | महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून भाजपमधूनच सरकार अस्थिर आणि राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या सोडल्या जात आहे. भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कराडमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपमधील अनेक माणस ही सत्तेसाठी हपापलेली आहे. त्यांना सत्तेत परत यायचं आहे. म्हणून त्यांनी या बातम्या सोडलेल्या आहेत. तसंच काहीही सुरु नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

ज्या राज्यात टेस्टिंगच होत नाही, ते राज्य आम्हाला शिकवणार का? की तुमची संख्या जास्त आहे. कोणाला आजार आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याला बरं केलं पाहिजे, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपशासित राज्यांना लगावला.

देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारला रोख पैसे ओतावे लागतील. लोकांना विश्वासात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. मात्र ही मानसिकता सरकारची दिसत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटत नाही, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडी सरकार सध्या स्थिर आहे पण….- सुधीर मुनगंटीवार

-सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

-केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

-…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

-भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतील, पण मी… नारायण राणेंनी भाजप नेत्यांना सुनावलं