मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब आणि त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचाराची वेळ संपलेली असतानाही सभा घेतली. तसेच आदर्श आचार संहितेचं उल्लंघन केलं, असा आरोप नसीन खान यांनी केला. याप्रकरणी नसीम खान यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सरकारला पाठिंबा देण्याचा भाग वेगळा आहे आणि हा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणं वेगळा भाग आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊन माझ्यासोबत जो अन्याय झाला आहे त्याबद्दलची ही तक्रार आहे. ही याचिका शिवसेनेला पाठिंबा दिला, महाविकासआघाडीची स्थापना झाली त्याआधी ही याचिका दाखल झाली आहे, असं नसीम खान यांनी सांगितलं आहे.
हा न्यायालयीन विषय आहे. हा आमचा व्यक्तिगत विषय आहे. हा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचा पाठिंबा त्याच्याशी याचा संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, जोपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वातील हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालेल तोपर्यंत या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका काँग्रेसकडून असणार नाही, असंही ते म्हणालेत.
दरम्यान, 2019 च्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सेनेचे उमेदवारांनी 21 ऑक्टोबरला मतदान असताना आणि 19 ऑक्टोबरला प्रचार बंद झाला असतानाही 20 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता सभा घेतली, पदयात्रा काढली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला होता, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यावर जी कारवाई होणं अपेक्षित होतं ती झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, असं नसीम खान म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील 5 दिवस ‘या’ भागात उष्णतेची लाट; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
…अन्यथा पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
“17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे आमदार जेलमध्ये जाणार”
गुंतवणुकदारांना केलं मालामाल! ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ
मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यावर गुन्हा दाखल